Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व आजही प्रेरणादायी – आकाश वडघुले

शिक्रापूर प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व्यक्ति मत्त्वातील बारकावे आजच्या युवकांनी समजून घेणे काळाची गरज असून छत्रपती शिवरायां

कोल्हे सहकारी कारखाना कार्यस्थळावर श्रीगुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता
लातूर जिल्हा बँकेच्या आर्थिक मदतीने युवक शेतकरी झाला रेशीमचा यशस्वी उद्योजक
शनाया फेम रसिका सुनील ने समुद्रकिनारी गुपचूप उरकला लग्नसोहळा | Filmy Masala (Video)

शिक्रापूर प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व्यक्ति मत्त्वातील बारकावे आजच्या युवकांनी समजून घेणे काळाची गरज असून छत्रपती शिवरायांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व आजच्या काळात युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युवा व्याख्याते आकाश वडघुले यांनी केले आहे.

  तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना युवा व्याख्याते आकाश वडघुले बोलत होते, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे हे होते, तर याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, डॉ . पराग चौधरी, दत्तात्रय वाबळे, प्रमोद पाटील,  व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. पद्माकर गोरे, मराठी विभागप्रमुख डॉ. संदीप सांगळे, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. मनोहर जमदाडे, डॉ. अमेय काळे, डॉ. सुमेध गजबे, डॉ. विवेक खाबडे, डॉ. रवींद्र भगत, डॉ. प्रमोद पाटील, प्रा. अजिता भूमकर, प्रा. आकाश मिसाळ, प्रा. कल्याणी ढमढेरे यांसह आदी उपस्थित होते. यांसह आदी उपस्थीत होते. यावेळी बोलताना स्वाभिमान व मेहनत काय असते तसेच जनता आणि स्वराज्याविषयी आत्मीयता कशी असावी याविषयीचा आदर्श वस्तुपाठ आपल्याला शिवरायांनी घालून दिला असल्याचे सांगत राष्ट्रमाता जिजाऊंनी आदर्श संस्कार शिवरायांना दिल्याने एक सुसंस्कारित आदर्श राजा शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्रास मिळाल्याचे भाग्य आपले असल्याचे युवा व्याख्याते आकाश वडघुले यांनी सांगितले. तर शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हे खऱ्या अर्थाने रामराज्य होते असे सांगत शिवकाळातील आदर्श वस्तुपाठ आपल्याला अंगीकारला पाहिजे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश ढमढेरे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय कारंडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. पद्माकर गोरे यांनी केले आणि डॉ. रवींद्र भगत यांनी आभार मानले.

COMMENTS