Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपतींच्या त्यागातून मिळालेले स्वराज्य अखंड हिंदुस्थानचे बलस्थान : पालकमंत्री विखे

लोणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यागातून मिळालेले स्वराज्य हेच अखंड हिंदुस्थानचे बलस्थान आहे. स्वराज्य स्थापनेचा इतिहास म्हणजे एक विचार आहे. त

प्रत्येक गोष्टीत धर्म आणणे भाजपची जुनी पद्धत
शिवरायांचा कारभार हा लोककल्याणकारी होता : माजी आ. काळे
कुळवाडी भूषण रयतेचे राजे 

लोणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यागातून मिळालेले स्वराज्य हेच अखंड हिंदुस्थानचे बलस्थान आहे. स्वराज्य स्थापनेचा इतिहास म्हणजे एक विचार आहे. त्या विचाराने वाटचाल करणे आपल्या सर्वांची बांधिलकी असली पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती निमित्ताने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याना कार्यस्थळावरील पुतळ्यास मंत्री विखे पाटील यांनी अभिवादन केले. लोणी बुद्रूक गावातही आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची महा आरती करण्यात आली. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन सोपानराव शिरसाठी, ट्रस वाहतूक संस्थेचे चेअरमन नंदकिशोर राठी, सरपंच कल्पना मैड, भाजीपाला सोसायटीचे व्हा.चेअरमन विजयराव लगड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 छत्रपती शिवाजी महाराज हे एकात्मता आणि सौहार्दतेचे प्रतिक आहेत. केवळ महाराष्ट्र आणि देशासाठी नाहीत तर, संपूर्ण विश्वासाठी आदर्श राजा म्हणून, त्यांची ओळख होते. अठरा पगड जाती जमातींना एकत्रित करुन, महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. जातीपातीच्या जोखडात अडकलेली समाज व्यवस्था त्यांनी रयतेचे राज्य स्थापन करुन, मुत केली. देशामध्ये अनेक राजे, रजवाडे होवून गेले. परंतू महाराजांचा इतिहासच अजरामर होवू शकला याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुत्सदेगिरीने असंख्य गड किल्ले जिंकले. महाराजांच्या इतिहासाची ही खरी साक्ष आहे. युनेस्को ने बारा गडकिल्ल्यांना वारसा स्थळांचा दर्जा जाहीर केला आहे. या गडकिल्ल्यांचे पावित्र तिर्थस्थळांप्रमाणेच आपण राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS