Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर : ‘घर घर संविधान’; उद्या(दि.२६) संविधान जाणीव जागृती रॅली

छत्रपती संभाजीनगर : ‘घर घर संविधान’ याअंतर्गत रविवार दि.२६ रोजी सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी हे संविधान जाणीव जाग

खासदार जलील यांच्यावर पैशांचा पाऊस
औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूटी अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण
ई-सिटी बसला मुहूर्त कधी लागणार ?

छत्रपती संभाजीनगर : ‘घर घर संविधान’ याअंतर्गत रविवार दि.२६ रोजी सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी हे संविधान जाणीव जागृती रॅली काढणार असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री संजय शिरसाट हे या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करणार आहेत, असे प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी कळविले आहे.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १,२,३ व मिलिंद व संत तुकाराम मुलांचे वसतिगृह,मुलांचे शासकीय वसतिगृह (जूने),गुणवंत मुलीचे शासकीय वसतिगृह व १००० मुलींचे शासकीय वसतीगृह,युनिट-४, छत्रपती संभाजीनगर येथील मुला-मुलींचा सहभाग असणारी संविधान जाणीव जागृती रॅली रॅली रविवार दि.२६ रोजी सकाळी सव्वा आठ वा. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या पुतळ्याच्या जागेपासून भडकल गेट ते महात्मा फुले चौक, औरंगापूरा पर्यंत रॅली काढण्यात येणार,अशी माहिती प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली आहे.

COMMENTS