Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

नाशिक:- महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज मंगळवारी (१४ मे) रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावे

पक्षाच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करावे : ना. जयंत पाटील
नगर -पाथर्डी येथे चोऱ्या केलेला चोरास मिरजगाव येथे अटक
मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात

नाशिक:- महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज मंगळवारी (१४ मे) रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.    

याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता योगेश निकम, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, प्रणाली विश्लेषक राजेंद्र सोनावणे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक विधी अधिकारी रणजित बोम्मी, व्यवस्थापक हेमंत भामरे व मंगेश गाडे, उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, सहाय्यक अभियंता भूषण पाटील व सागर खंबाईत, उपव्यवस्थापक सदू जाधव, बसप्पा पांढरे व दिपक देवरे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

COMMENTS