Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराजांनी समाज उभारणीचे काम केले -आ शंकरराव गडाख

गणेशवाडी येथे छत्रपती संभाजीराजे जयंती संपन्न.

सोनई प्रतिनिधी -  नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्म उत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडला.  संदीप  लोहकरे, संत

श्री गुरुदत्त इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा 100 टक्के निकाल
राज्यस्तरीय शब्दगंध युवा यशस्वी उद्योजक 2025 पुरस्कर प्रसाद भडके यांना जाहीर
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत सुरु होणार नवा अध्याय | Filmi Masala | LokNews24

सोनई प्रतिनिधी –  नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्म उत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडला.  संदीप  लोहकरे, संतोष वैरागर, विठ्ठल लोहकरे, संदीप रावसाहेब लोहकरे, देवीदास तनपुरे, अनिल तांदळे, आदिनाथ काळे, भागवत तांदळे, किरण खेडे, सतिश बेल्हेकर, भाऊसाहेब शेटे यांनी  प्रवरासंगम येथुन आणलेल्या गंगाजलाने महराजांच्या मुर्तीस मंत्रोच्चाराच्या जय घोषात  सेवा सोसायटीचे संचालक नारायण दहिफळे यांचे हस्ते जलाभिषेक करण्यात आला. आमदार शंकरराव गडाख यांचे हस्ते महाराजांच्या प्रतीमेस    पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.  धर्मवीर संभाजी महाराजांनी समाज उभारणीचे काम केले.  समाजासाठी युध्द ही केले व समजास एकत्र ठेवले  गणेशवाडी ग्रामस्थांनी  मिळुन जे छत्रपती संभाजी महाराज सम स्मारकाचे काम केले ते खरच कौतुकास्पद असल्याचे  गौरवउद्गार आमदार शंकरराव गडाख यांनी केले.या वेळी शिवचिंदबरम माध्यमिक विद्यालयाचे सचिव दत्तात्रय लोहकरे, मधुकर दरंदले गुरुजी,कृष्णा तांदळे,  सरपंच कैलासराव दरंदले,  सेवा सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अक्षय लोहकरे  यांनी सेवा सोसायटीच्या वतीने  आमदार शंकरराव गडाख यांचा सन्मान केला. , तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव बडे, पोलीस पाटील संजय दहिफळे,सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांयकाळी जिल्हा परिषद सदस्य सुनील  गडाख व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांचे हस्ते आरती व ७ ते ९ या वेळेत शाहीर कल्याण काळे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तदनंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

COMMENTS