मुंबई प्रतिनिधी - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी रात्री केलेल्या एका ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. मर
मुंबई प्रतिनिधी – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी रात्री केलेल्या एका ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनासमोर ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी शड्डू ठोकून उभे राहिलेले छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं अंजली दमानिया यांनी गुरुवारी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या ट्वीटवर दमानिया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यानुसार, भाजपाकडून छगन भुजबळांना प्रमोट केलं जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आक्रमकपणे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडत आहेत. काही वर्षांपूर्वी अजंली दमानिया यांनी छगन भुजबळांवर आक्रमकपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्वीटमध्ये भुजबळांवरील आरोपांचा संदर्भ घेत भाजपाला लक्ष्य केलं आहे. एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप?” असा प्रश्न अंजली दमानिया यांनी एक्स (ट्विटर)वरील पोस्टमधून उपस्थित केला आहे
दरम्यान, हे ट्वीट व्हायरल होऊ लागल्यानंतर अंजली दमानियांनी त्यावर त्यांची नेमकी भूमिका बोलताना स्पष्ट केली आहे. “काही दिवसांपूर्वी मला कुणीतरी सांगितलं होतं की भुजबळांना भाजपा ओबीसी चेहरा बनवणार आहेत. फक्त राज्यातच नाही, तर देशभरात त्यांना तसं प्रमोट केलं जाणार आहे. मागे मंडल आयोगाच्या लढ्याच्या वेळी भुजबळांनी दिलेलं योगदान बरंच मोठं होतं. त्यामुळे भुजबळांना तसं करायचं भाजपाचं ठरलंय. त्यामुळे मला जेव्हा हे पुन्हा कळलं, तेव्हा फार विचित्र वाटलं”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
COMMENTS