Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ संतप्त

नाशिक/नागपूर :मंत्रिमंडळाचा विस्तारात ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचे पडसाद सोमवारी दिसून आले. मंत्रीपद न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जा

टाळेबंदीच्या चर्चेने बाजारात गर्दी ; किराणा, दूध भरपूर उपलब्ध
उसाच्या नर्सरीतून महिला लखोपती
मंत्री विखेंची अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाची ऑफर

नाशिक/नागपूर :मंत्रिमंडळाचा विस्तारात ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचे पडसाद सोमवारी दिसून आले. मंत्रीपद न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच माध्यमांनी वरिष्ठांना आपली नाराजी सांगणार असा थेट सवाल केला असता, कोण वरिष्ठ असा प्रतिसवाल भुजबळ यांनी केला. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावलले काय आणि फेकले काय, काय फरक पडतो. मंत्रीपदे आली गेली.., भुजबळ कधी संपला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
यासोबतच भुजबळ यांनी नागपूर सोडत थेट नाशिक गाठले. त्यामुळे भुजबळ वेगळी काय भूमिका घेतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भुजबळांनी सभागृहात हजेरी लावली. मात्र मंगळवारपासून छगन भुजबळ मतदारसंघात असणार अशी माहिती मिळत आहे. यावेळी नाशिकमध्ये समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन छगन भुजबळ भेटणार आहेत. या भेटीमध्ये ते समता परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहे. होय, मी नाराज आहे. मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, त्याचे बक्षीस मिळाले, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील भुजबळांनी दिली आहे. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठे यश मिळाले. तसेच अजित पवारांशी मी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

आता राज्यसभेवर जाणार नाही
आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जा, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. अशी माहिती देखील भुजबळ यांनी दिली आहे. मी पूर्वी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक होतो. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर आता मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक नसल्याचे मी पक्षाला स्पष्टपणे कळवले होते, असे देखील भुजबळ यांनी सांगितले आहे. मला माझ्या मतदारांनी निवडून दिले आहे. मग आता मी जर राज्यसभेवर गेलो, तर ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे.

COMMENTS