Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चेतन पिपाडा बनले कमर्शियल पायलट

शिर्डी ः संतांची भूमी असलेल्या राहाता शहराच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील व्यावसायिक गोपीशेठ पिपाडा यांचे सुपुत्र चेतन प

 माळीवाडा येथील दारु विक्री अड्ड्यावर छापा
पुणतांब्यावरून तालुक्याला जाण्यासाठी बस नसणे दुर्देवी
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराला 14 सुवर्ण

शिर्डी ः संतांची भूमी असलेल्या राहाता शहराच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील व्यावसायिक गोपीशेठ पिपाडा यांचे सुपुत्र चेतन पिपाडा हे नगर जिल्ह्यातील पहिले कमर्शियल पायलट बनले आहेत. याचा आदर्श घेऊन परिसरातील तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करावे असे मत भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी चेतन पिपडा याचा सन्मान करते वेळी व्यक्त केले.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी त्यांचे बजरंगबलीची शॉल घालुन त्यांचे सत्कार केला याप्रसंगी मदनलाल पिपाडा महावीर पिपाडा, गोपी पिपाडा, माया पिपाडा, शितल पिपाडा,लिलाबाई पिपाडा,माया पिपाडा,साहील पिपाडा आदी उपस्थित होते. चेतन पिपाडा यांनी कमर्शियल पायलट लायसन्स अँड ट्रेनिंग या अभ्यासक्रमासाठी  2022 मध्ये न्यूझीलंड येथे प्रवेश घेतला होता. दीड वर्षांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून  चेतन पिपाडा  परतले आहेत. पायलट प्रशिक्षणासाठी चेतन याला अमेरिकेत जायचे होते परंतु कोविड मुळे त्याला व्हिसा मिळू शकला नाही. त्यामुळे त्याने या प्रशिक्षणासाठी न्यूझीलंड ची निवड केली. हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने अतिशय कष्ट घेतले आहे. वैमानिक होणे हे एक आव्हानात्मक काम आहे त्यामुळे असे करियर मोजकेच तरुण निवडतात. चेतन ने हे वेगळे क्षेत्र निवडले व त्याचे प्रशिक्षणही यशस्वी रित्या पूर्ण केले यामुळे शहरातील सर्व नागरिक व शुभचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS