Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिप्पट पैशाचे आमिष दाखवून मसूरच्या युवकांची 42 लाख रुपयांची फसवणूक

मसूर / वार्ताहर : ट्रेंडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यावर तिप्पट फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कराड तालुक्यातील मसूर व उंब्रज येथील युवकांना 42 ला

नृत्यकला अकॅडमीची विद्यार्थिनी पौर्णिमा अंबरगे ठरली मिस फलटण
विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 सप्टेंबर रोजी :उपआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर
व्यापार्‍याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

मसूर / वार्ताहर : ट्रेंडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यावर तिप्पट फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कराड तालुक्यातील मसूर व उंब्रज येथील युवकांना 42 लाख 36 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने गुंतवणूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत पोलिसांची माहिती अशी, अभिषेक चंद्रशेखर वेल्हाळ (रा. मसूर) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये त्यांना 1 जानेवारी 2021 मध्ये वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून ट्रिनिटी एफएक्स व आँस्कर एफएक्स या ट्रेंडिंग अ‍ॅपविषयी माहिती सांगण्यात आली. त्यांनी त्यांचे कंपनीचे अकाउंट नंबर फोनवर पाठवले. वेळोवेळी पैशाची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामध्ये गुंतवलेले पैसे दोन महिन्यांमध्ये तिप्पट होतील, असे सांगितले. म्हणून मी 1 जानेवारी ते 31 जुलै 2021 पर्यंत 21 लाख 91 हजार 360 रुपये पाठवले. त्याचबरोबर माझे मित्र सचिन प्रकाश जगदाळे, आनंदा सदाशिव जगदाळे, मोहन प्रकाश जगदाळे (सर्व रा. मसूर), दिग्विजय पांडुरंग मराठे (रा. उंब्रज) यांच्याशीही संबंधित कंपनीच्या अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधून पैशाची गुंतवणूक करण्यास सांगितले.
त्यावरून सचिन जगदाळे यांनी 7 लाख 24 हजार, आनंदा जगदाळे यांनी 6 लाख 71 हजार 500, दिग्विजय मराठे यांनी 2 लाख, मोहन जगदाळे यांनी 4 लाख 50 हजार रुपये पाठवले. संबंधितांना सर्व व्यवहार अ‍ॅपच्या माध्यमातून फोनवर दिसत होते. मात्र, अचानक जुलै 2021 महिन्यामध्ये अ‍ॅप अचानक बंद झाले. त्यावर मी व मित्रांनी संबंधित फोन नंबरवर वारंवार संपर्क साधला. परंतू त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधिताविरोधात फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.

COMMENTS