Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगामी वर्षातील चातुर्मासचे आयोजन जामखेडला करावे

जामखेडमधील जैन श्रावक संघाची मागणी

जामखेड ः जैन समाजातील पवित्र असा 2024 मधील चातुर्मास कार्यक्रम जामखेडला आयोजित करण्यात यावा अशी विनंती जामखेड जैन श्रावक संघाच्या वतीने परमपूज्य

गोदावरी कालव्याच्या पाण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा : कोल्हे
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे होणार प्रशिक्षण
पोलिस असल्याचे सांगून पैसे व दारु बॉक्सची मागणी

जामखेड ः जैन समाजातील पवित्र असा 2024 मधील चातुर्मास कार्यक्रम जामखेडला आयोजित करण्यात यावा अशी विनंती जामखेड जैन श्रावक संघाच्या वतीने परमपूज्य सुनंदाजी महाराज यांच्याकडे केली आहे. परमपूज्य सुनंदाजी महाराज व आदी ठाणा 5 यांनी 2024 या सालामध्ये जामखेड मध्ये चातुर्मास करण्याची विनंतीला मान देऊन त्वरित वर्तमान राष्ट्रसंत आचार्य शिवमुनीजी महाराज यांच्या परवानगीने व महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने सन 2024 साठी चातुर्मास जाहीर केला.
यावेळी आचार्य राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांची पावनभूमी मिरी तालुका पाथर्डी या ठिकाणी दीक्षा जयंती महोत्सव निमित्त कार्यक्रम पार पडला. सदरील कार्यक्रमांमध्ये  जामखेड येथे सन 2024 चातुर्मास करण्यासाठी श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ  व सकल जैन समाज जामखेड मधील सर्व श्रावक, श्राविका, ज्येष्ठ युवा सर्वांनी जामखेड ते मिरी संघ यात्रा काढून महाराज साहेबांच्या 2024 चातुर्मास जामखेड मध्ये व्हावा यासाठी विनंती केली. यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे ,उपाध्यक्ष- महावीर बाफना, संतोष फिरोदिया, मंगेश बेदमुथा, संजय गांधी, सुंमतीलाल बोथरा, काका भळगट, जवाहरलाल गुदेचा, नितीन सोळंकी, महेंद्र बोरा, पवन कांकरिया, संदीप भंडारी, चंदुशेठ बेदमुथा,  कांतीलाल बोथरा, प्रवीण गादिया, प्रशांत बेदमुथा, सकल जैन समाजातील महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जामखेडला चातुर्मास होत असल्याची  बातमी कळताच जामखेड मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले व सर्वांनी स्वागत केले.

COMMENTS