पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी परीक्षेच्या घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढत, शनिवारी सनदी अधिकारी
पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी परीक्षेच्या घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढत, शनिवारी सनदी अधिकारी सुशील खोडवेकर याला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने खोडवेकर यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खोडवेकर हे या पूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते. खोडवेकर यांनी शिक्षक भरती परीक्षेत घोटाळा केल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे. हा घोटाळा कसा झाला? याची माहिती खोडवेकर यांच्याकडून पोलीस काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या घोटाळ्यात आणखी कोणते बडे मासे हाती लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलिसांनी या घोटाळ्यातील खोडवेकर यांच्या सहभागाबाबतची विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही. सुशील खोडवेकर हे 2009च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते. सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळ्याची पाळंमुळं खोदून काढण्यास सुरुवात केली असून खोडवेकर यांना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अटक सत्र सुरूच राहणार
टीईटीमध्ये 7800 अपात्र उमेदवार पात्र ठरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यामुळे आणखी लोकांना यामध्ये अटक होणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात वेगवेगळया ठिकाणाहून आतापर्यंत 40 आरोपीना अटक करण्यात आली आहे. यामधील काहीआरोपी यातील काही आरोपी हे म्हाडा, आरोग्य भरतीमध्येही सहभागी आहेत.
COMMENTS