नवी दिल्ली ः राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या तेलंगणातील दहशतवादी कारवायांच्या कट प्रकरणात 11 जण

नवी दिल्ली ः राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या तेलंगणातील दहशतवादी कारवायांच्या कट प्रकरणात 11 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. पैकी 10 आरोपी तेलंगणातील तर एक आरोपी आंध्र प्रदेशातील आहे. एनआयएने हैदराबादेतील विशेष कोर्टात या प्रकरणाची याचिका दाखल केली. 4 जुलैला गुन्हा दाखल झाला होता. आतापर्यंतच्या तपासानुसार ही संघटना मुस्लिम तरुणांची दिशाभूल करत होती. त्यांची भरती केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण केंद्रावर पाठवले जात होते. योगा क्लासेस व शारीरिक शिक्षणाच्या नावाखाली असे प्रकार केले जात होते. नवीन मुलांना सुरी, लोखंडी रॉड इत्यादी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जात होते. त्याचा वापर हत्या करून दहशत निर्माण करण्यासाठी होत होता, असे एनआयएच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS