कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथिल जि.प.प्राथमिक शाळा हरिसन ब्रँच शाळेत जागतिक टपाल दिनानिमित्त येथील टपाल कार्यालयास भ
कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथिल जि.प.प्राथमिक शाळा हरिसन ब्रँच शाळेत जागतिक टपाल दिनानिमित्त येथील टपाल कार्यालयास भेट देऊन पोस्टमास्तर अर्णव कंक्राळे यांची शाळेतील मुलांनी मुलाखत घेत ते करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना त्यांनी पोस्ट कार्यालयात काळानुरूप कशा पद्धतीने बदल होत गेले याबाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्राचा प्रवास टपालपेटीत आल्यानंतर कशा पद्धतीने सुरू होतो ? पोस्टातील विविध योजनांची माहिती यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना दिली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अगदी दिलखुलासपणे दिली. त्यामध्ये शाळेतील शर्वरी मोरे, असद शेख, उमेजा शेख, शिफा शेख, अनुष्का सोनवणे, आर्यनी शिंदे, गणेश बर्डे यांनी पोस्टमास्तर अर्णव कंक्राळे यांना पोस्टाबद्दल व त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी, छंद, शिक्षण, पत्राचा प्रवास, पोस्टमनसाठी पात्रता यासंबंधी विविध प्रश्न विचारले. पूर्वीच्या काळी निरोप पोहचविण्यास किंवा खुशाली विचारण्यास पोस्टातील पत्रांचा वापर केला जात होता.आधुनिक युगात सोशल मिडियामुळे जग अगदी जवळ आले आहे.मोबाईलच्या जमाण्यात लोकांना पत्राचा विसर पडला आहे.म्हणून आज जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून हरिसन ब्रँच शाळेने पोस्टमास्तरची मुलाखत व टपाल सेवेबद्दल माहिती जाणून घेतली, असे शाळेचे शिक्षक नवनाथ सुर्यवंशी यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापिका रंजना डोंगरे यांनी केले. यावेळी जेऊर कुंभारी गावातील डाक कार्यालयाचे ब्रँच पोस्टमास्तर अर्णव कंक्राळे, पोस्टमन ऋषिकेश वक्ते, सेवानिवृत्त पोस्टमन भगवान डोले व उपस्थित ग्रामस्थ यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.
COMMENTS