पंचवटी - शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी बाजार समिती शेतकरी व व्यापारी यातील दुव्याचे काम करते. टोमॅटोच्या खरेदी-विक्रीचे व्यवह
पंचवटी – शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी बाजार समिती शेतकरी व व्यापारी यातील दुव्याचे काम करते. टोमॅटोच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार शरदचंद्र पवार मार्केटयार्डमध्ये होत असून, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या व्यवहाराच्या वेळेत बदल करीत सोमवार (ता. ०२) पासून दुपारी बारा वाजता हे व्यवहार होणार आहेत. त्याचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. टोमॅटो मार्केटच्या वेळेत बदल शेतकऱ्यांच्या सोयीचा निर्णय असून याचा फायदा शेतकऱ्याला अधिक मिळणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा सभापती देविदास पिंगळे यांनी केले. ते शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथील टोमॅटो मार्केट वेळेत बदल शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे, उपसभापती विनायक माळेकर, संचालक युवराज कोठूळे, उत्तमराव खांडबहाले, प्रल्हाद काकड, राजाराम धनवटे,भास्करराव गावित, विलास कड, व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील यांचे सह तसेच बाजार समिती सचिव प्रकाश घोलप, सहायक सचिव मनोज महाले, विजय निकम निवृत्ती बागुल तसेच टोमॅटो मार्केट व्यापारी मंगेश खलसे, सुरेश जयस्वाल, राजेश म्हैसधुणे, राजू काटकर, बाळू महाले, होरिलाल यादव, बाळू नेटारी, प्रदीप यादव, संजय उगले , लालदेव यादव, सचिन गांगुर्डे, कौशल कुशावाह, किरण धंदूके, अशोक सानप, मनोज यादव, सागर सुराशे, रोशन बिकानेर, जुनेद बागबान आदी उपस्थित होते.
पुढे सभापती देविदास पिंगळे म्हणाले की, पूर्वी टोमॅटो मार्केटची वेळ ही चार वाजेची होती. त्यामुळे लिलाव होऊन पॅकिंग करून पाठविण्यात वेळ होत असे. तसेच शेतकरी बांधवांनी एक दिवस अगोदर खुडा केलेला टोमॅटो हा उशिराने मार्केटमध्ये येत होता. शेतकऱ्यांची त्यामुळे गैरसोय होत होती. यासाठी शेतकरी हिताचा निर्णय घेत संचालक मंडळांनी टोमॅटो मार्केटच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे शेतकऱ्याना यांचा फायदा होणार आहे. तसेच व्यापारी वर्गाला देखील टोमॅटो पॅकिंग करून रात्री सात ते आठ वाजेपर्यंत पाठवता येईल.
COMMENTS