Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत गोरोबाकाका मंदिराच्या प्रस्तावित महाद्वाराची जागा बदला :तेर ग्रामस्थांची मागणी

तेर : येथील संत गोरोबा काका मंदिर परिसरात प्रस्तावित असलेल्या कामांत अनेक महत्वपूर्ण बदल करन वास्तूशास्त्राच्या नियमांची पालमल्ली प्रशासनाकडून कर

महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून
मराठा समाजाची बैठक पुढे ढकलली
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सन 2025-26 आर्थिक वर्षाचे 52 कोटी अंदाजपत्रक सादर

तेर : येथील संत गोरोबा काका मंदिर परिसरात प्रस्तावित असलेल्या कामांत अनेक महत्वपूर्ण बदल करन वास्तूशास्त्राच्या नियमांची पालमल्ली प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात तेर ग्रामस्थांनी सहायक धर्मादाय आयुक्त धाराशीव यांच्याकडे निवेदन देवून प्रस्तावित महाद्वाराची जागा बदलण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे महाद्वार कमानिची जागा बदलण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या मंदिर परिसरात अगोदर महाद्वार असलेल्या जागेत महाद्वार न उभारता इतर ठिकाणी ते महाद्वार कमानीचे काम चालु केले आहे. त्यामुळे तेर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संतश्रेष्ठ श्री गोरोबा काकांच्या मंदिर परिसरात प्रस्तावित असलेल्या महाद्वार कमानीसाठीची जागा पाणीपुरवठा चालू असलेल्या पाण्याची टाकी पाडून त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. सदरील कमान रोडलगत होणे अपेक्षीत आहे. त्यामुळे आगामी काळात महाद्वार कमानीचे जे काम चालू होणार आहे ते काम थांबवून रोड लगत कमानीचे बांधकाम करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच नवीन जागा प्रस्तावित करायची असेल तर तेर ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन व संत गोरोबा काका मंदिरांत ग्रामस्थांची बैठक घेऊन महाद्वार कमानीची जागा निश्‍चित करावी. यापूर्वी जे शौचालय झाले ते सुद्धा पूर्व बाजूला नसते असे वास्तुशास्त्र सांगते पण मंदिर परिसरात पूर्व बाजूस केले. त्यामुळे जी कामे सुरू असतील ती थांबवावीत अशी मागणी केली आहे. या निवेदनावर महादेव खटावकर, ईतीश चौगुले, अमोल थोडसरे आदींसह ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे.

महाद्वाराची जागा बदलण्याचा घाट कशासाठी?
तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर वास्तू शास्त्रानुसार काम झालेले आहे. असे असतांना याठिकाणी जर काही बदल करायचा असेल तर त्यासाठी ग्रामस्थांना विश्‍वासात घेण्याची गरज आहे. मात्र सर्व नियम पायदळी तुडवून तेर येथील संत गोरोबा काका यांच्या मंदिराचे जुने महाद्वारऐवजी नवे महाद्वार आग्नेय दिशेला पाणी टाकी असलेल्या ठिकाणी महाद्वार करण्याचा घाट घातला आहे. सदर कामकाज थांबवले नाही तर, याविरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खा. ओमराजे निंबाळकर यांनी घेतली दखल
तेर ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली असून, याप्रकरणात आपण जिल्हाधिकार्‍यांच्या कानावर हा प्रकार टाकणार असून, प्रस्तावित आणि नियोजीत जागेऐवजी महाद्वाराची जागा बदलण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे, याचा जाब विचारणार असल्याचे आश्‍वासन खासदार महोदयांनी तेर ग्रामस्थांना दिले आहे.

COMMENTS