Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवडला बसचालक वाहकास मारहाण

चांदवड : किरकोळ कारणातून एसटी बसला थांबवून जीपमधील चौघांनी बसचालक व वाहकास बेदम मारहाण केली. याप्रकरणी बसचालक भैय्यासाहेब दयाराम भामरे (वय ५५, मु

मुंबईत कॅब चालकाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरूणाचा अत्याचार
भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण

चांदवड : किरकोळ कारणातून एसटी बसला थांबवून जीपमधील चौघांनी बसचालक व वाहकास बेदम मारहाण केली. याप्रकरणी बसचालक भैय्यासाहेब दयाराम भामरे (वय ५५, मुक्ताई कॉलनी, मालेगाव) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मालेगाव आगाराची बस (क्र. एमएच १३ सीयू ६८५१) ही मालेगावकडून नाशिककडे चालक भामरे व वाहक हेमंत आहेरराव हे मुंबई-आग्रा महामार्गान घेऊन चांदवड तालुक्यातील आडगाव शिवारातून जात असताना जीप (क्र. एमएच २८ एएन २६२४) चालकाने बस आडवली. ‘जीपच्या दिशेने बस जोरात का आणली?’ अशी विचारणा करीत चालक व वाहक यांना मारहाण केली. याप्रकारानंतर चालकाने बस चांदवड पोलिस ठाण्यात नेत जीपमधील अशोक गांगुर्डे, तुषार पवार, ऋतिक शिंदे (सर्व रा. वडाळीभोई) व एका •अज्ञात तरुणाविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल केला. चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, नाईक शिरसाठ आदींनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

COMMENTS