Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचा चंद्रपूर अभ्यास दौरा 

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत नाशिक जिल्हा परिषदेचा

गांजा, अफूची विक्री करणार्‍या महिलेसह तिघे अटकेत
तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल; चित्रा वाघ यांना सवाल.
सोयीचे राजकारण

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत नाशिक जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा हा चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असून दि.२७ ते ३० जानेवारी दरम्यान हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद नाशिक व राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचे अभ्यास पथक हे नागपूर महसुली विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील नाविन्यपूर्ण उपक्रम त्याचबरोबर विविध योजना राबवण्यासाठी कार्यपद्धती याबाबत अभ्यास करणार आहेत. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वर्षा फडोळ यांच्या उपस्थितीत दि.२६ रोजी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अभ्यास पथक हे नागपूर महसुली विभागातील चंद्रपूर जिल्ह्यात रवाना झाले.

COMMENTS