Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात शुक्रवार आणि शनिवारी पावसाची शक्यता

मुंबई : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 26 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर ज

कराड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराचा मुुलगा ठार
राष्ट्रीय पातळीवरील कृषी नारी सन्मान पुरस्कार सौ. शालिनीताई विखे पाटील यांना जाहीर
माण तालुक्यातील उसाला तुरे; साखर कारखान्या अभावी उस उत्पादक चिंतेत

मुंबई : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 26 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; 27 डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्‍चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि 28 डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागातील शेतकर्‍यांनी कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

COMMENTS