Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील

नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस
मुंबईसह ठाण्यात पावसाचा धुमाकूळ

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात या पावसाचा शेती पिकांना मोठा फटकाही बसला आहे. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून देखील गेल्या आहेत.
दरम्यान सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा मुसळधार कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देम्यात आला आहे. बांगलादेश किनार्‍यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 24 तासांत पश्‍चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरे ओलांडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून पुढील अवघ्या चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

COMMENTS