Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालठाणा सियम येथल आदिवासी हक्काच्या रेशन पासून वंचित  

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा

बुलडाणा - चालठाणा सियम ता.जळगांव जामोद जि बुलढाणा येथील आदिवासी बांधव गेंदालाल नकु भिलाला मोहन गेंदालाल जमरा शिवा काशिराम निहाल विशाल गोंडु निहाल

गुजरातमधील पंचमहालमध्ये भिंत कोसळून 4 मुलांचा मृत्यू
हृदयद्रावक ! कडबा कुट्टी मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू | LOKNews24
ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका झाल्यास मतदानावर बहिष्कार : नंदकुमार कुंभार

बुलडाणा – चालठाणा सियम ता.जळगांव जामोद जि बुलढाणा येथील आदिवासी बांधव गेंदालाल नकु भिलाला मोहन गेंदालाल जमरा शिवा काशिराम निहाल विशाल गोंडु निहाल गुणवंता दादु निहाल शालीग्राम मुन्सी निहाल व इतर रेशनकार्ड धारक सर्व राहणार चालठाणा सियम ता जळगांव जामोद जि बुलढाणा यांनी येथिल स्वस्त धान्य दुकानदार समाधान लक्ष्मण हागे चालठाणा सियम ता जळगांव जामोद जि बुलढाणा हे गावातील आदिवासी बांधवांच्या हककाचे रेशन नियमानुसार देत नसून हक्काचे रेशन पासून वंचित ठेवत असल्याने सदर दुकान दुसऱ्या दुकानाल जोडण्यात यावे अशी मागणी करत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या आहेत. चालठाणा सियम येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडे आमचे रेशनकार्ड असुन वरील स्वस्त धान्य दुकानदार हा आम्हास आमचे अत्योदय योजनेचे मिळणारे ३५ किलो धान्य नियमित देत नाही व दर महिण्यास फक्त १५ ते २० किलो धान्य देत आहे. त्यामुळे वरील दुकाणदार हा आमच्या हक्काचे राहीलेले धान्य काळ्याबाजारात विकुन काळा बाजार करीत आहे. असल्याचा आरोपही तक्रारदार आदिवासी समाजाचे नागरीक असून आम्ही अशिक्षीत अडाणी आहोत. त्यामुळे आमच्या अशिक्षीत अडाणीपणाचा वरील दुकानदार गैरफायदा गेल्या सात वर्षापासुन आमचा गैरफायदा घेत आहे त्यामुळे कायदेशिर कार्यवाही करुन त्याचा परवाना रद्द करुन गावामधिलच दुसऱ्या  दुकानाला जोडावे ,तसेच गावातील आदिवासी दुकाणदारास समजाविण्याचा प्रयत्न केला असता तो त्याच्या अंगावर भांडण्यास येतो व तुमच्याकडुन जे होत असेल ते करुन घ्या. माझे कोणी काही बिघडवु शकत नाही. तुम्ही मुख्यमंत्र्याकडे किंवा प्रधानमंत्री मोदीकडे गेले तरी माझे काही बिघडवु शकत नाही अशा उर्मट पने वागतो. त्यामुळे वरील दुकानदाराविरुध्द कठोर कायदेशिर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली तसेच 

हागे दुकानदार हा दरमहिण्याला आमचे आंगठे घेतो व आम्हाला मिळालेल्या मालाच्या पावत्या देत नाही. त्यामुळे शासनाकडुन आम्हाला किती धान्य मिळाले याचा बोध होत नाही. आमच्या गावातील २० ते २५ लोकांकडुन प्रत्येकी ३००० रुपये घेवुन रेशनकार्ड काढुन दिले व रेशनकार्ड काढल्यावर सुध्दा आम्हा धान्य मिळत नाही व रेशनकार्ड ऑनलाईन केलेले नाही. त्यामुळे दुकानदाराविरुध्द कायदेशिर कार्यवाही न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करु. वरील स्वस्त धान्य दुकानदारा विरुध्द कायदेशिर कार्यवाही करुन त्याचा परवाना रद्द करुन न्याय द्यावा अशा व्यथा मांडल्या परंतू जिल्हा पुरवठा अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

COMMENTS