Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालते बोलते विद्यापीठ काळाच्या पडद्याआड गेले-अ‍ॅड.सुभाष राऊत

बीड प्रतिनिधी - ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांनी वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्य

ऑक्सिजन प्लान्टच्या ठिकाणी आता संचारबंदी
 वाळू माफियांच्या दहशतीने हादरला जालना जिल्हा 
लालबागच्या राजाच्या दर्शनाची गर्दी पाहून घाबरला अजय देवगणचा मुलगा.

बीड प्रतिनिधी – ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांनी वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे एका चालत्या बोलत्या विद्यापीठात आपण मुकलो असल्याची प्रतिक्रिया समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी दिली आहे. हरी नरके यांच्या पुण्य आत्म्यास चिर शांती लाभावी अशी प्रार्थना करून बीड जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण शद्धांजली वाहण्यात आली आहे.

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये प्रा. हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन प्रा. हरी नरके यांनी केले होते.

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा समावेश आहे.राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांचे ते निकटवर्ती होते.
 त्यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला आहे.

मराठी साहित्य क्षेत्रात अतिशय मोलाचे कार्य असणार्‍या प्रा.हरी नरके यांनी देशाच्या ओबीसी चळवळीत वैचारिक प्रबोधन करून समाजात जनजागृती करण्याचे मोठ काम केल. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत त्यांनी संघटनेसाठी भरीव असं काम केल. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडत असतांना राज्यात आणि देशभरात त्यांनी वैचारिक प्रबोधन करून संघटन अधिक मजबूत केलं. ओबीसींवर जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांनी आपल्या लेखनातून, भाषणातून वाचा फोडली. आपल्या विपुल लेखनाने त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला अमिट असा ठसा उमटविला होता. विशेषतः महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर संशोधनपर साहित्याची निर्मिती त्यांनी केली. या महापुरुषांच्या समग्र वाड्मयाचे त्यांनी संपादन केले. याबाबत जगभरात त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने देखील दिली. मराठी भाषा ही संस्कृत,कन्नड, तेलगु यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीमध्ये प्रमुख समन्वयक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल. त्यांनी निर्माण केलेलं साहित्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. प्रा.हरी नरके यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा समता पुरस्कार तसेच सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अनेक शासकीय आणि देशपातळीवरील त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्था, संघटनांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या निधनाने साहित्य, कला, सांकृतिक, सामाजिक क्षेत्राची तसेच ओबीसी आणि परिवर्तनवादी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.  त्यांच्या पुण्य आत्म्यास चिर शांती लाभावी याकरिता बीड जिल्हा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण शद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. सुभाष राऊत बोलत होते. याप्रसंगी गणेश जगताप (प्रदेशाध्यक्ष, परीट समाज, महाराष्ट्र), अ‍ॅड. संदीप बेदरे (संस्थापक अध्यक्ष संत नरहरी महाराज जयंती उत्सव समिती), प्रा.रफीक बागवान (जिल्हाध्यक्ष, मुस्लीम ओबीसी संघटना), प्रकाश कानगांवकर (जिल्हाध्यक्ष, बारा बलुत्तेदार संघटना), इंजि. विष्णुदादा देवकते (संस्थापक अध्यक्ष, युवा मल्हार सेना), संजय गुरव (जिल्हाध्यक्ष गुरव समाज), समता परिषदेचे अविनाश उगले, बीड शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत, जिल्हा उपाध्यक्ष नितीन साखरे, रामभाऊ मेजर राऊत, बापु गाडेकर, दत्ता गोंदणे, सचिन राऊत, जगनाथ खेत्रे, शितलदास आडसुळे, दत्ता बोडखे, मुकूंद शिनगारे, दिगांबर नाईकनवरे, वैजिनाथ शिंदे, गणेश काळे, अशोक गुंजाळ, बाबा घोडके, कृष्णा शिंदे, सावता रासवे, धनंजय काळे, सावता काळे, राम कटारे, मनोज भानोसे, बाळु धोत्रे, कपील राऊत, वैभव खेत्रे, धर्मराज दुधाळ, अविनाश धायगुडे, बाळु यादव, राजाभाऊ कटारे, चंद्रकांत साळुंके, अजय राऊत, दिनेश गायकवाड, सुधाकर रासवे, अशोक गोबरे, अजय कोकाटे, सखाभाऊ गोबरे, वैभव राऊत, विलास खेत्रे, सचिन आडसुळे, सुमंत राऊत, गोरख आखाडे, गणेश चिंचाणे, वचिष्ट यादव, मधुकर चांदणे, राहुल गवळी, बाळु यादव, पुरुषोत्तम खेत्रे, किरण राऊत, महादेव कटारे, वैभव शिंदे, ऋत्वीक शिंदे, अशोक राऊत, अशोक जाधव, राजेश शेलार, आकाश मोहोळकर, दीपक भुजबळ, रामेश्वर राऊत, पियुष साळुंके, नामदेव मेहत्रे, अनिल चौधरी, महेश व्यवहारे, स्वप्नील यादव, संतोष यादव, हनुमंत कोकाटे, मंगेश बलतुकर, बालाजी राऊत, सुमीत सावंत, बालाजी भुजबळ, विलास सरडे आदींसह समता परिषदेचे पदाधिकारी, समता सैनिकांसह समता प्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS