Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठ्ठल मंदिरात रंगला चक्री भजनाचा सोहळा

पंढरपूर प्रतिनिधी - माघी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चक्री भजन झाले. चक्री भजनाची शेकडो वर्षांची परंपरा आहे.

पुण्यासाठी ऑक्सिजन आणण्याचा तुघलकी आदेश
जरांगेंच्या आमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा
आत्महत्या रोखण्यासाठी अनोखा उपक्रम

पंढरपूर प्रतिनिधी – माघी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चक्री भजन झाले. चक्री भजनाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. औसा येथील औसेकर महाराज यांना मंदिरात चक्री भजन करण्याचा मान आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांची ही चक्री भजनाची सेवा सुरू. गुरूबाबा औसेकर हे त्यांचा पुढे वारसा चालवत आहे. चक्री भजन करून देवाला प्रसन्न केले जाते. गळ्यात विणा..डोक्यावर हिरवा पटका त्यावर लाल पट्टी पायात चाळ असा शृंगार करून देवापुढे नाचत चक्राकार  फिरून भजन केले जाते. हे भजन पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

COMMENTS