कोपरगाव प्रतिनिधी ः परमपूज्य सदगुरु आत्मा मालिक माऊलींच्या पावन सानिध्यात व सकल आत्मा मालिक संत पिठाच्या उपस्थितीत 1 एप्रिल ते 6 एप्रिल 2023 या क

कोपरगाव प्रतिनिधी ः परमपूज्य सदगुरु आत्मा मालिक माऊलींच्या पावन सानिध्यात व सकल आत्मा मालिक संत पिठाच्या उपस्थितीत 1 एप्रिल ते 6 एप्रिल 2023 या कालावधीत कोकमठाण आश्रमामध्ये आत्मा मालिक चैत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष पूजनीय संत परमानंद महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना परमानंद महाराज म्हणाले की, परमपूज्य सदगुरु आत्मा मालिक माऊली व सकल आत्मा मालिक संत पिठाच्या सानिध्यामध्ये या महोत्सवात साही दिवस सर्व भाविकांच्या सेवेसाठी आत्मज्ञान पर आधारित विविध विषया वरील मार्गदर्शन, तज्ञांची व्याख्याने, संत महंतांची प्रवचने, तसेच कीर्तन महोत्सव व पूर्ण उत्सवा दरम्यान दररोज विविध आजारांवरील तपासणी व उपचारांचे मोफत शिबिर आयोजित केल्याची माहिती ही दिली .या दिव्य महा तिथीचा अमृत योग सकल भाविकांना अनुभवण्यास मिळावा म्हणून हे विशाल आयोजन काकड आरती, मौन, ध्यान, भजन, प्रवचन, हरिपाठ सत्संग गुरुयाग व कीर्तन महोत्सवासह महा दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ज्या भाविकांनी 45 दिवसाचे उपवास केले आहेत अशा भाविकांचा अनुष्ठान विधी संत शांतीमाई यांचे हस्ते संपन्न होणार आहे महाप्रसाद व्यवस्थेसाठी प्रशस्त मंडप व्यवस्था उभारण्यात आलेली आहे ,या पञकार परिषदेस सत्संग आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज, कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज, आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे सदस्य संत विवेकानंद महाराज सह संत चंद्रानंद महाराज, संत सतपात्रानंद महाराज, संत साधनानंद महाराज, संत आनंद महाराज, संत राजनंद महाराज, संत जितेंद्रानंद महाराज, संत किराणानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज, संत विजयानंद महाराज, संत योगानंद महाराज, संत पठारे महाराज, संत सेवादास महाराज, संत शेलार महाराज, संत सर्वेक्षानंद महाराज, संत प्रभावती माई, संत स्मृतीमाई, विश्वस्त बाळासाहेब गोरडे व सकल संत व संत माता उपस्थित होते. सदगूरु माऊलीच्या अधिष्ठानाखाली संपन्न होणार्या चैत्र महोत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे असे आमंञण सकल संतपिठ व विश्वस्त मंडळाच्या वतीने देण्यात आले.
COMMENTS