Homeताज्या बातम्यादेश

सभापती जगदीप धनखड यांचा ’आप’ला दणका

राघव चढ्ढा यांना राज्यसभेत पक्षनेते स्वीकारण्यास नकार

नवी दिल्ली ः राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. राघव चढ्ढा यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे

मताचे राजकारण सर्वांसाठी घातक
अदानी समूहाला ‘सर्वोच्च’ क्लीन चीट  
’मविआ’ कोणतीही फूट पडणार नाही ः खा.डॉ. अमोल कोल्हे

नवी दिल्ली ः राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. राघव चढ्ढा यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्याची आपची मागणी त्यांनी फेटाळून लावली आहे. सभापती धनखड यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
राघव चढ्ढा यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्याचे आपची मागणी त्यांनी फेटाळून लावली आहे. संजय सिंह यांच्या जागी आपने खासदार राघव यांची राज्यसभेत पक्षनेता म्हणून नियुक्ती केली होती. राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात, आप पक्षाने म्हटले आहे की, संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चढ्ढा यापुढे वरच्या सभागृहात पक्षाचे नेते असतील. मात्र धनखड यांनी हे मान्य करण्यास नकार दिला आहे. दिल्ली दारू धोरण प्रकरणी आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी सांगितले की, चड्ढा यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याबाबत आपकडून पत्र प्राप्त झाले आहे. यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी राज्यसभेच्या सरचिटणीसांना पत्र पाठवले होते. राघव चढ्ढा हे राज्यसभेच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक असल्याची माहिती आहे. सध्या आपचे राज्यसभेत एकूण 10 सदस्य आहेत. भाजप, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनंतर राज्यसभेतील सदस्यसंख्येच्या बाबतीत आप हा चौथा सर्वात मोठा पक्ष आहे.

COMMENTS