Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ.संभाजी महाराज पुतळा प्रकरणी मराठा युवकांचा मोर्चा

मुख्याधिकार्‍यांवर कार्यवाहीची मागणी

मुखेड प्रतिनिधी - शहरातील संभाजी चौक येथील पुतळा प्रकरण वरचेवर चिघळत असून यात दोषी असणाया नगर पालिकेच्या मुख्याधिका-यावर कार्यवाही करावी या मागणी

भीमा कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा
श्री स्वामीचे अनुभव | श्री स्वामी समर्थ | Shri Swami Anubhav | LokNews24
अकासा एअर आणि इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा

मुखेड प्रतिनिधी – शहरातील संभाजी चौक येथील पुतळा प्रकरण वरचेवर चिघळत असून यात दोषी असणाया नगर पालिकेच्या मुख्याधिका-यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी आज शहरातून मराठा समाजाच्या युवकांनी मोर्चा काढून तहसिल कार्यालयाच्या आवारात छोटेखानी सभा घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार राजेश जाधव यांना दिले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांची उपस्थिती होती.
येथील पुंडलीक चौधरी यांनी नगर पालिका मुखेड येथे खोटे कागदपत्र सादर करुन नमुना नं.8 ची नोंद केली व राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जागा हडप करण्याचा प्रयत्न केला आहे.यामुळे समाजात अशांतता निर्माण होवून तेढ निर्माण होत आहे,सदर बाब मुख्याधिकारी यांना कागदोपत्री पुरावा देवून व वेळोवेळी कळवून सुध्दा जाणिवपुर्वक पुंडलिक चौधरी यांच्याशी संगनमत करुन त्यांचे नमुना नं.8 रद्द करत नाहीत त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करत नाहीत यामुळे 26 ऑगस्ट रोजी पुंडलीक चौधरी यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी सदर जागेत असलेला राजे छत्रपती संभाजी महाराज यांची पाटी व झेंडा काढण्याचा प्रयत्न केला व त्यांचा अपमान करून समाजात अशांतता पसरवून तेढ निर्माण केली असून त्यास मुख्याधिकारी हे जबाबदार आहेत. याकामात जाणिवपुर्वक कसूर केल्याबद्दल व पुंडलिक चौधरी व त्यांचे नातेवाईकांविरोधात संभाजी महाराज यांचे नियोजित जागेतील झेंडा व पाटी काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावार राजमुद्रा ग्रुपचे सचिन पाटील इंगोले,प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद पा.तेलंग,शिवशंकर पाटील कलंबरकर,अशोक बच्चेवार,प्रदीप पाटील हसनाळकर,गिरीधर पाटील केरुरकर,आंनद पाटील जाधव,मगदुम पठाण,संदिप पाटील तोंडचीर,सदाशिव सुगावे,बळवंत पाटील बोडके,बालाजी पा.वडजे,अमोल पा.अतनुरे,गोविंद पा.टेकाळे,बंडू पा.वडजे,सचिन पास.चिखलीकर,कृष्णा गोडबोले,किरण पा.वडजे,राजु पा.गोणारे,महेश पा.शिंदे,ज्ञानेङार पा.शिंदे,गौतम वडजे,साईनाथ शिंदे,शिवा कार्लेकर,राजेङार पा.इंगोले,सय्यद अब्दुल,धीरज पा.गोजेगावकर,अमोल पा.गोजेगावकर,राजु पा.गोजेगावकर,दिनेश आप्पा आवडके आदी कार्यकत्र्यांच्या सह्या आहेत.

COMMENTS