पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे दररोज नव-नवे कारनामे समोर येतांना दिसून येत आहे. त्यामुळे पूजा खेडकरांच
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे दररोज नव-नवे कारनामे समोर येतांना दिसून येत आहे. त्यामुळे पूजा खेडकरांचा पाय खोलात जातांना दिसून येत आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरने आपले एम.बी.बी.एसचे वैद्यकीय शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले होते. तिथे प्रवेश घेताना तिने ती पूर्णतः फीट असल्याचे तिला कोणताही आजार नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्याचबरोबर त्यावेळी तिचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील तिने ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र देखील सादर केले असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेताना तिचे नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंद करण्यात आले होते. या सगळ्याबाबत या वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. अरविंद भोरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी यूपीएससीकडे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे. दिव्यांग कोट्यातून तिला नोकरीही मिळाली. मात्र आता वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलेले नाही. मग यूपीएससीच्या वेळीच तिला दिव्यांगपणा आला का असा? प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यावेळी खेडकरला सीईटीमध्ये 200 पैकी 146 गुण मिळाले होते. दरम्यान या गोष्टींवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परिक्षेनंतर पूजा खेडकरची आयएएसपदी नियुक्ती देखील झाली. पुण्यात तिचा प्रोबेशन कालावधी सुरू असतानाच तिने आपल्या खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा लावला. त्याचबरोबर तिने आपल्या त्याच गाडीवर ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्डही लावला होता. याशिवाय प्रोबेशन काळ सुरू असताना तिने सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर, सरकारी कर्मचारी अशा गोष्टींची मागणी केली होती. यामुळे तिच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आलेली होती. त्यानंतर पूजा खेडकरची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. हे प्रकरण चर्चेत असतानाच पूजा खेडकरच्या सोबतच तिच्या कुटुंबियांचे देखील रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात 2007 मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. त्यावेळी सीईटीद्वारे तिला प्रवेश मिळाला होता. त्यावेळी देखील तिने एनटीसी-3 या प्रवर्गातून प्रवेश घेतला होता, तिचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.
आई-वडील फरार, फोन बंद – आयएएस अधिकारी पूजा खेडकरांचे आई-वडील फरार झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी (15 जुलै) सांगितले की, ते त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांचा फोन बंद केला आहे. पोलिसांनी सांगितले- आम्ही काल आणि आज दोनदा बाणेर रोडवर असलेल्या त्याच्या बंगल्यावर गेलो, पण दोन्ही वेळा ते घरी सापडले नाही. त्यांचा शोध लागल्यावर चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
COMMENTS