नाशिक : केंद्र व राज्य शासनाद्वारे मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आखल्या जातात माझी कन्या भाग्यश्री या योजनेनंतर दिनांक 01 एप्रिल 2023 नंतर
नाशिक : केंद्र व राज्य शासनाद्वारे मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आखल्या जातात माझी कन्या भाग्यश्री या योजनेनंतर दिनांक 01 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी “लेक लाडकी” ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींची संख्या वाढविणे ,मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, बालविवाह थांबविणे,मुलींचा मृत्यू दर कमी करणे ,मुलींमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे ,मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करून शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहित करणे एकूणच मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘लेक लाडकी’ योजना राबवली जात आहे. त्याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद नाशिकच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने सदर योजना राबवण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 30 ऑक्टोम्बर 2023 रोजी काढण्यात आला आहे. पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये इयत्ता सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये, अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये व मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले ही योजना 01 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुली वा एक मुलगा व दुसरी मुलगी वा दुसऱ्या वेळेस जन्माला आलेल्या जुळ्या मुली यांना सदर लाभ देण्यात येईल पालकांनी कुटुंब शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील व पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत असणे आवश्यक राहील यासाठी लाभार्थ्यांनी नजीकच्या अंगणवाडी केंद्रात वा तालुक्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात संपर्क करून अर्ज सादर करावा अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली.
COMMENTS