मुंबई : राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा लावताच राजकीय वातावरण तापले आहे. धुळवड सुरु झाली आहे. मशिदीवरचे भोंगे काढण्य
मुंबई : राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा लावताच राजकीय वातावरण तापले आहे. धुळवड सुरु झाली आहे. मशिदीवरचे भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तीन मे पर्यंत भोंगे काढले नाही, तर पाचवेळा हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला आहे. या पाश्वर्र्भूमीवर केंद्र सरकार राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देण्याच्या तयारीत आहे.
ठाकरेंना आता धमक्या मिळू लागल्या आहेत. पीएफआयसारख्या संघटनांकडून राज ठाकरेंना मिळालेल्या धमक्या पाहता मोदी सरकार राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. राज 5 जून रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. या दौर्यात योगी सरकारकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे समजते. राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत सभा घेण्याचे रविवारी पुणे येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. ठाकरे यांनी ही घोषणा करताच सर्वांचेच लक्ष या ऐतिहासिक शहराकडे लागले आहे. ठाकरे यांनी सभेसाठी औरंगाबाद निवडणं, यामागील ‘राज’नितीची अनेक कारणे असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
COMMENTS