Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औषधनिर्माण क्षेत्रात कुशल मनुष्यबळ घडवणारे केंद्र

मुकुल आगासे यांनी केले जनार्दन स्वामी फॉर्मसी महाविद्यालयाचे कौतुक

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जर्नादन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष पदविका व पदवी औषधनिर्मा

राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा , 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध | Lok News24
जयहिंद लोक चळवळीच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये शनिवारी व रविवारी खा.सुप्रिया सुळे,सत्यजीत तांबेंसह विविध मान्यवर
शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये लगीनघाई सुरू l पहा LokNew

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जर्नादन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष पदविका व पदवी औषधनिर्माणशास्त्र विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आरजेएस अर्थात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फॉर्मसी महाविद्यालय शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून, औषधनिर्माण उद्योगाला कुशन मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम आरजेपी करत असल्याचे प्रतिपादन मुकुल आमाको आगासे यांनी केले. आगासे हे सिन्नर येथील साईटक स्पेशालिटी प्रा. लि. कंपनीत उत्पादन व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी एमआयटी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सांगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले उन्नत भविष्य घडविण्यासाठी आरजेएस शैक्षणिक संकुल हा एक चांगला पर्याय निकाला आहे. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, संचालक प्रसाद कानूकडे, संजय नागरे, दिपक कोटमे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितिन जैन, जैन व इतर शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व क्षेत्र दिप प्रज्वलनाने झाली, तसेच संकेत म्हस्के यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी डॉ जैन यांनी नवीन विदयार्थ्यांचे मनोबल वाढवत त्यांना या क्षेत्रात नोकरी साठी भरपूर संधी असून सुरुवातीपासून ध्येय निश्‍चित करून त्या अनुषंगाने वाटचाल करण्यास सांगितले.

COMMENTS