Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सिद्धिविनायक शाळेतील बौद्धिक अक्षम – बहुविकलांग मुलांसमवेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

नाशिक प्रतिनिधी - श्री सिद्धिविनायक शाळेतील बौद्धिक अक्षम - बहुविकलांग मुलांसमवेत आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आल

प्रशासकांना बँक वाचवायची नाही ; नगर अर्बन बचाव कृती समितीचा आरोप, दालनात झाली हमरीतुमरी
आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो… राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा
कोणीही सत्तेत या, पण लवकरात लवकर राज्यातील गोंधळ संपवा | LokNews24

नाशिक प्रतिनिधी – श्री सिद्धिविनायक शाळेतील बौद्धिक अक्षम – बहुविकलांग मुलांसमवेत आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक लेडीज सर्कल ११९ अध्यक्षा चारू लाठी व नाशिक राऊंड टेबल १०७ अध्यक्ष मानव अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .शाळेतील विशेष विद्यार्थी आदित्य शिंदे याने स्वातंत्र्यदिनानिमित्त माहिती सांगितली ,मुलांनी ध्वजाच्या चित्रामध्ये डाळींचे चिकट काम, हाताचे ठसे काम, कागदी झेंडे बनवलेले होते .याचबरोबर संदीप युनिव्हर्सिटी BBA चे दिप्ती कोल्हे , नयना गुप्ता, प्रतिक उगले यांच्या संकल्पनेतून शाळेतील विशेष विद्यार्थी रुद्र गायकर – हिंदू, नुरानी शेख – मुस्लिम, कानिज खान, – शिख , बबलु पंडीत -ख्रिश्चन या सर्व धर्म समभाव एकतेची .. मुलांकडून वेशभुषा करून दाखवली तसेच सौम्या गोळसंगी- भारत माता , पारस बस्ते महात्मा फुले वेशभूषेत होता ,लेडीज सर्कल व राऊंड टेबल इंडिया मा.अध्यक्षा डॉ.मेघा राठी यांच्या विशेष सहकार्यातुन सर्व मुलांना युनिफॉर्म देऊन गोड खाऊ वाटप करण्यात आले .कार्यक्रमासाठी लेडीज सर्कल व राऊंड टेबल इंडिया चे पदाधिकारी – सदस्य , संस्थेचे सचिव निलेश धामणे , दिनेश भामरे व यांचे सहकारी मित्र रेहा इंजि संचालक शैलेश सहाणी , आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र खरात , चंद्रकांत महाले , योग शिक्षिका स्मिता शिनकर , पिंगळे परिवार , संस्थेचे शुभचिंतक , पालक यावेळी उपस्थित होते .संस्थेचे सचिव निलेश धामणे यांनी पाहुण्यांचे आभार मानले .

COMMENTS