Homeताज्या बातम्यासंपादकीय

लोकशाहीचा उत्सव आणि मूल्ये

जगातील सर्वात मोठी लोकशाहीप्रधान असलेल्या देशाच्या अर्थात भारताच्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. देशातील लोकशाहीचा उत्सव म्हणून लोकसभा निव

माजी सरन्यायाधीशांचा बाणेदारपणा
जागावाटपांतील नाराजीनाट्य
सीमावर्ती भागातील गावांच्या विकासाचा प्रश्‍न

जगातील सर्वात मोठी लोकशाहीप्रधान असलेल्या देशाच्या अर्थात भारताच्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. देशातील लोकशाहीचा उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जाते आणि 18 व्या लोकसभेसाठीच्या तारखा काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचा हंगाम जवळ आला आहे. लोकसभा निवडणूक म्हटली की, देशभरात मतदान होणार आहे. लोकशाहीचा उत्सव म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे बघितले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. वास्तविक पाहता भारताने जो लढा उभारला होता, तो स्वातंत्र्यासाठी होता. लोकशाहीसाठी नव्हे. मात्र स्वातंत्र्यानंतर आपल्याला लोकशाही आपसुकच आपल्याला आयती मिळाली. या लोकशाहीसाठी अमेरिका, फे्ंरच राज्यक्रांतीसारख्या आपल्याला क्रांती करावी लागली नाही. त्यामुळे अजूनही लोकशाहीचे मूल्ये तळागाळापर्यंत रूजली नाहीत. लोकशाहीमध्ये प्रचंड ताकद असून, भारतीय संविधानात आम्ही लोक या शब्दाला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यामुळे भारतामध्ये खरी ताकद ही आम्ही लोक मध्ये आहे. भारतात आम्ही लोक सर्वश्रेष्ठ आहे, तर दुसरीकडे ब्रिटनमध्ये संसद सर्वश्रेष्ठ आहे, हा भेद आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे संविधानानुसार देशातील सर्व ताकद जनतेच्या हाती निहित आहे. मात्र खरंच ही ताकद तुमच्या हातात आहे का ? हा महत्वाचा प्रश्‍न आहे. वास्तविक पाहता आम्ही लोक जरी सर्वश्रेष्ठ असलो आमच्या हातात देशाची ताकद निहीत असली तरी, तिचा वापर आपण लोकशाहीसाठी करत नाही. कारण लोकशाहीची मूल्ये आपल्यात अजूनही रूजलेली नाहीत. ती लोकशाहीची मूल्ये जेव्हा आपल्यात रूजेल तेव्हाच आपण सक्षम, चारित्र्यवान, आणि लोकांच्या प्रती बांधील असलेला, लोकाभिमुख कारभार करणार्‍या लोकप्रतिनिधीला निवडून देऊ. मात्र असं आपल्या देशात होत नाही. बहुतांश लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे दाखल असतात, अन्यथा एकदा का लोकप्रतिनिधी निवडून आला की, त्याच्याजवळ कोट्यावधींची माया गोळा होते. आणि त्याच्या कित्येक पिढ्या-राजकारणात आपला जम बसवतांत. आणि आपण कार्यकर्ते त्यांच्याभोवती पिंगा घालतांना दिसतो. भाई, दादा, काका, याभोवतीच पिढ्या-पिढ्या राजकारण फिरतांना दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती लोकप्रतिनिधी होत नाही. काही होत असले तरी, त्यांची संख्या नगण्य आहे. ही संख्या वाढण्याची खरी गरज आहे. सर्वसामान्य व्यक्ती राजकारणात आला पाहिजे, त्यांनी लोकाभिमुख कारभार करण्याची खरी गरज आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. हे या राष्ट्रीय मतदार दिवसाने अधोरेखित केलेले आहे. तरीदेखील आपल्या देशात 60 ते 65 टक्क्यांच्या पुढे मतदान होत नाही ही शोकांतिका आहे. मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी देऊनही अनेक सुशिक्षित कुटुंब हॉलीडे साजरा करतांना दिसून येतात. मतदानांचा टक्का वाढण्याची खरी गरज आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. आप-आपल्या कार्यालयातील जो व्यक्ती मतदान करणार नाही, अशा व्यक्तींना दंडित करण्याची गरज आहे. लोकशाहीसाठी, मतदानांसाठी आपण आजही सजग नाही. आपण आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा पावित्रा घेतो, आणि तिथेच लोकशाहीची फसगत होते. त्यामुळे लोकशाही रूजवण्यासाठी आधी तिचे मूल्ये आपल्याला जन-मानसांत रूजवण्याची खरी गरज आहे. तरच लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी झाल्याचे दिसून येईल. अन्यथा मतदार राजा असूनही तो आपले सरकार ठरवू शकत नाही. कारण ते ठरवणारे आहेत, भांडवलवादी उद्योजक, ते ठरवणारे आहेत, राजकारणी. त्यामुळे मतदारराजा निराशेच्या अवस्थेत कायमच दिसून येतो. 

COMMENTS