परिवहनमंत्री अनिल परब यांना सीबीआयचे समन्स ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिवहनमंत्री अनिल परब यांना सीबीआयचे समन्स ?

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांना सीबीआयने समन्स पाठवल्यामुळे खळबळ उडाली असून, परब यांनी यासाठी एक महिन्याची व

पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 15 ठार, 50 जखमी
नाशिक येथे गुंतवणूकदार सेवा केंद्र कार्यान्वित 
पिसे येथील पिरसाहेब यात्रा कोरोनामुळे रद्द | ‘माझं गाव माझी बातमी’ | LokNews24

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांना सीबीआयने समन्स पाठवल्यामुळे खळबळ उडाली असून, परब यांनी यासाठी एक महिन्याची वेळ मागितल्याचे समोर आले आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात झालेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदली प्रकरणी हे समन्स पाठवलं असल्याचाी माहिती मिळतेय. याआधी सीताराम कुंटे आणि डीजीपींचीही चौकशी करण्यात आली होती. मात्र यावर बोलतांना मला कुठलेही समन्य आले नसल्याचे परब यांनी म्हटले आहे.त्याचप्रमाणे समन्स आलेलंच नाही तर वेळ कशासाठी मागायचा, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करण्याचा भाजपचा डाव असून, अनिल परबांना पाठवलेली समन्स हा देखील त्याचाच एक भाग असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. महाराष्ट्रातून सत्ता गेल्यानंतर भाजपचे नेते यंत्रणांना हाताशी घेऊन महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना बदनाम करण्यासाठी राजकारण करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. अनिल देशमुखांच्या काळात पोलिस अधिकार्‍यांचा बदल्या करण्यात आल्या होत्या. अनिल देशमुख गृहमंत्री असताना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप कऱण्यात आला होता. मनी लॉड्रिंगबाबत सध्या ईडीकडून तपास सुरु आहे. चांदिवाल आयोगाससोरही सध्या या प्रकरणाची चौकशी सूरू आहे. बदल्यांमधून पैसे मिळालेत का, मनी लॉड्रिंग झालंय का, याबाबत चौकशी केली जाते आहे.

COMMENTS