Homeताज्या बातम्यादेश

मुख्यमंत्री सोरेन यांना सीबीआयचे समन्स

रांची/वृत्तसंस्था ः झारखंड राज्यातील माजी राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव आणि रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसन या धर्मांतर प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री

डबल इंजिन सरकारमुळे विकासकामांना गती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बिगर खात्याचे मंत्री झेंडावंदनाला जाणार
दानशूर व सशुल्क दर्शन आरती घेणार्‍या साईभक्तांना लाडु प्रसाद पाकीट सुरू करा ः साईराज गायकवाड 

रांची/वृत्तसंस्था ः झारखंड राज्यातील माजी राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव आणि रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसन या धर्मांतर प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना विशेष सीबीआय न्यायालयाने समन्स बजावले आहे. धर्मांतर, लैंगिक छळ आणि हुंडाबळीचा हा खटला असून त्यात सीएम सोरेन यांना साक्षीदार बनवण्यात आले आहे.
याप्रकरणी रणजीत बर्‍याच दिवसांपासून तुरुंगात आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी रणजीतच्या बचाव पक्षाने न्यायालयात दिलेल्या साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव आहे. रणजीत कोहलीच्या वकिलाने दिलेली यादी सीबीआयचे विशेष न्यायाधीश पीके शर्मा यांच्या न्यायालयातही स्वीकारण्यात आली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात आले आहे. रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसन याला फिर्यादी पक्षातील 26 साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने यादी देण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसन यांच्या घरी एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते. या घटनेच्या आधारे रणजीत कोहलीने हेमंत सोरेन यांचे नाव दिले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन वागणुकीबद्दल विचारले यांना रणजीत कोहली यांनी त्यांच्या पत्नीशी केलेल्या जाऊ शकते. या दोघांना भेटण्याचा त्यांचा वैयक्तिक अनुभव काय होता, असाही सवाल केला जाऊ शकतो. आता मुख्यमंत्री विशेष न्यायालयात हजर राहणार का, हा प्रश्‍न आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मुख्यमंत्री न्यायालयात हजर राहतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ते न्यायालयात हजर झाले तर त्याचे म्हणणे कोणाच्या बाजूने जाईल? हे देखील पाहावे लागेल. रणजीत कोहली आणि तारा शाहदेव यांचा विवाह 7 जुलै 2014 रोजी झाला होता. तारा शाहदेवने आरोप केला आहे की तिने ज्या व्यक्तीला रंजीत समजले, वास्तविक तो रकीबुल हसन होता. लग्नानंतर ताराकडून त्याने हुंडा मागितल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. धर्मांतरासाठी तिचा छळही करण्यात आला.

COMMENTS