Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरेशनगरमध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर उत्साहात

नेवासा फाटा : निर्मलग्राम आदर्शगाव सुरेशनगर येथे 7 मे रोजी पुणे येथील सुप्रसिध्द के.के.आय इन्स्टिट्यूड बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने

भाविकाचा अपघातात मृत्यू; पाच जण जखमी
संगमनेर तालुक्यात 2933 लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले जमा
जादा पैसे घेणार्‍या रुग्णवाहिकेवर होणार कारवाई

नेवासा फाटा : निर्मलग्राम आदर्शगाव सुरेशनगर येथे 7 मे रोजी पुणे येथील सुप्रसिध्द के.के.आय इन्स्टिट्यूड बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळ्यांचे शिबिर व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर पार पडले. यावेळी  गरजू रुग्णांना चश्मा वाटप देखील करण्यात आले.गेली सलग तीन वर्षांपासून मोफत केशर उदोग समूह हा उपक्रम राबवत आहे. या शिबिराचे आयोजन के.के. आय इन्स्टिट्यूडचे मनीषा कोरडे, शिवाजी भवर यांनी केले. सुरेशनगर आणि येथील 87 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि त्यातील 17 जणांचे बुथराणी हॉस्पिटल पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
      या कार्यक्रमास उपस्थित असणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रथम लोकनियुक्त सरपंच पांडुरंग उभेदळ, होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, सुरेशराव पा.उभेदळ (व्हा.चेअरमन,मारुतरावजी घुले पतसंस्था,भेंडे) बबनराव शेटे, बापूसाहेब शेगर (तंटामुक्त अध्यक्ष) भिवसेन रंधवे, आण्णासाहेब क्षीरसागर, नवनाथ शेटे, हरिश्‍चंद्र शेळके, अशोक पाषाण, रामजी मामा पाडळे, राजूभाऊ खंडागळे, पोपटराव भणगे, पवार, प्रदीप भणगे, रमेश कणगरे, अनिल उभेदळ, बाबासाहेब गायकवाड, शरद क्षीरसागर, योगेश उभेदळ, संदीप कणगरे, मोहन बाबर, सागर शेटे, रामभाऊ खंडागळे, राजेंद्र उभेदळ, सुनील गायकवाड, तसेच अनिताताई उभेदळ (मा.सरपंच), मीराताई जाधव (अध्यक्ष नेवासा तालुका बौद्ध महासंघ), प्रेरणा ताई उभेदळ, चंदाताई रसाळ,पिसाळ, सुरेखा ताई शेटे, शशिकला ताई राऊत, मंगलताई देशपांडे, शोभाताई भणगे, रंजना ताई जाधव, कावेरीताई पठाडे (कृषी सखी) विमलबाई चावरे, आदी सर्व गावकरी मंडळी व महिला वर्ग, वृध्द वर्ग आदी सर्वजण उपस्थित होते. तसेच आलेल्या सर्व ग्रामस्थ, माता भगिनी यांचे केशर उद्योग समूह उद्योजक अमृत पा.उभेदळ व समस्थ मित्र परिवार यांच्या वतीने सर्वांचे या शिबिराचा लाभ घेतला याबद्दल सर्वांचे आभार मानले.

COMMENTS