नवी दिल्ली ः बॉलिवूड चित्रपटांचा कास्टिंग डायरेक्टर आणि अॅक्टिंग कोच मयंक दीक्षित यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरा

नवी दिल्ली ः बॉलिवूड चित्रपटांचा कास्टिंग डायरेक्टर आणि अॅक्टिंग कोच मयंक दीक्षित यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरामध्ये त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये मयांकच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरु आहे. कास्टिंग डायरेक्टर मयंक दीक्षित यांना लक्ष्मी नगर परिसरात मारहाण करण्यात आली. कार रिव्हर्स घेण्यावरुन मयंकचे काही लोकांसोबत वाद झाला. या वादानंतर या लोकांनी मयंकला बेदम मारहाण केली.
COMMENTS