Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सगे-सोयर्‍यांना जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ

छत्रपती संभाजीनगरमध्ये झळकले बॅनर्स ; शुभेच्छूक म्हणून वंचित आघाडीचा उल्लेख

छ.संभाजीनगर ः राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा संघर्ष तीव्र झालेला असतांना बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये सगे-सोयर्‍यांना जात प्रमाणपत्र देणे म्हणजे

सचिव भांगेंचे मागासवर्गीयांचा निधी कपातीमागे षडयंत्र ?
तक्रारदार गायब, पण खटला सुरू !;परमबीर सिंहांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका
खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात शहरात निघणार मोर्चा – आमदार संजय शिरसाट

छ.संभाजीनगर ः राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा संघर्ष तीव्र झालेला असतांना बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये सगे-सोयर्‍यांना जात प्रमाणपत्र देणे म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ असल्याचा मजकूर झळकल्याने मनोज जरांगे बॅकफूटवर जातांना दिसून येत आहे. सगे-सोयर्‍यांना आरक्षण देवू नये, खोट्या कुणबी नोंदी करण्यासाठी ओबीसी नेते आमरण उपोषणाला बसले होते. तर त्याविरोधात मी एकटा पडलो, असे विधान मनोज जरांगे यांनी केले होते. त्यानंतर ओबीसी-मराठा संघर्ष तीव्र होत असतांनाच दुसरीकडे वंचितचे बॅनर्स झळकल्यामुळे नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापैकी एक बॅनर छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात लावण्यात आला आहे. या माध्यमातून सगेसोयर्‍यांच्या आरक्षणाला स्पष्टपणे विरोध करण्यात आला आहे. आर.बी. फाउंडेशनकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख शुभेच्छूक असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही मराठा समाजाला सगेसोयर्‍यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यायला विरोध केला आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.

फलकावर लिहिले आहे की, शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे. त्यामधे रक्ताच्या नातेवाईकांची (वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या) जात प्रमाणपत्रे हा एक आवश्यक पुरावा असतो. या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला बगल देण्याचे काम ’सगेसोयरें’ (रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना) जातप्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे केलेले आहे. आरक्षण कायदा व नियमावली मधे चुकीची ढवळाढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे. अशा प्रकारे संविधानाची आरक्षण निती आणि आरक्षणा मागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधक करत आहेत. त्यामुळेच समाजातील सामाजिक सौहार्द व बंधुभावाला तडे जात आहेत. जाती समुहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र आहे. वंचित बहुजन आघाडी सगसोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी या ठरावाद्वारे ही परिषद करीत आहे.

COMMENTS