Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रास्ता रोको करणार्‍या स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः नगर-मनमाड महामार्गावर कांदा निर्यात शुल्क धोरणाविरोधात रास्ता रोको करणार्‍या स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह 30 कार्यकर

संभाव्य वादळ व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी- तहसीलदार चंद्रे
अंजली महामेर यांना नारीशक्ती साहित्य पुरस्कार प्रदान
सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान विविध समस्यांनी ग्रासले

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः नगर-मनमाड महामार्गावर कांदा निर्यात शुल्क धोरणाविरोधात रास्ता रोको करणार्‍या स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह 30 कार्यकर्त्यांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राहुरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी व कांद्याला किमान तीन हजार रुपये भाव जाहिर करावा.तसेच कांदा अनुदान 350/-रुपये प्रतिक्वींटल अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या दरम्यान पोलिस व आंदोलकांची शाब्दीक चकमक उडाल्याने आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न झाला होता.आंदोलकांनी महामार्गावर झोपून आंदोलनास सुरवात केल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करुन राहुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.      
 जिल्हाधिकारी यांनी पारीत केलेले जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने व रहदारीस अडथळा निर्माण करून जनसामान्यांची गैरसोय कढ्ढू बेकायदेशीर जमाव जमविल्याने आणि पोलीस अधिकार्‍यांने  दिलेल्या सुचनांचे पालन न केल्याने विविध कलमान्वये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरें यांच्यासह 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. राहुरी पोलिस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब रोहकले यांच्या फिर्यादीवरून रवींद्र बांपुसाहेब मोरे, बाबासाहेब सोमा जाधव, प्रकाश बाबासाहेब देठे, जुगल किशोर गोसावी, कृष्णा नानासाहेब मुसमाडे, दिपक तनपुरे, पिंटूनाना साळवे आदिंसह 20-25 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS