Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैसे वाटपाच्या संशयावरून कराडमध्ये गुन्हा दाखल

सातारा / प्रतिनिधी : कराड दिक्षण विधानसभा संघातील केतन विजय कदम (रा. रेठरे बु।, ता. कराड, जि. सातारा) यांच्या विरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात

फसवणूक करून हडपलेली जमीन सरकार जमा: प्रांताधिकारी कट्यारे यांचा ऐतिहासिक निकाल
महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावल्या कोयना-महाराष्ट्र एक्सप्रेस
घाणबी येथे कोसळला विजेचा खांब; पाटण महावितरण कार्यालयाचा अनागोंदी कारभार

सातारा / प्रतिनिधी : कराड दिक्षण विधानसभा संघातील केतन विजय कदम (रा. रेठरे बु।, ता. कराड, जि. सातारा) यांच्या विरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे.
सुहास मनोहर पांढरपट्टे रा. ज्यु. क. शिक्षक वेणुताई चव्हाण कॉलेज कराड यांच्या तक्ररीवरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारीचा तपशिल पुढीप्रमाणे. केतन विजय कदम (रा. रेठरे बु।, ता. कराड) दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी सायं. 4 वाजण्याच्या सुमारास मौजे कोळेवाडी, ता. कराड येथे विधानसभा निवडणूक 2024 चे मतदान करण्यासाठी प्रलोभन दाखविण्यासाठी रोख रक्कम 1 लाख 16 हजार 500 रुपये व मतदान यादी त्यांच्याकडे मिळून आली आहे. यामुळे त्यांच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तक्रारदारांना योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याबाबत समज देण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक फौजदार खाडे पुढील प्रतिबंधक कारवाई करत आहेत.

COMMENTS