Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापुरात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

सोलापूर ः अल्पवयीन पीडित मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण

सत्ताधारी-विपक्ष लोकशाहीच्या मुळावर !
पश्‍चिम बंगालमध्ये वंदे भारत रेल्वेवर दगडफेक
राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत ; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

सोलापूर ः अल्पवयीन पीडित मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 10 मार्च रोजी पीडितेवर अत्याचार करणार्‍या दोघा नराधमांनी पीडितेवर हल्ला केला. त्यानंतर ती अल्पवयीन मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या त्या पीडित मुलीचा फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केला. याचवेळी त्यांनी भाजपावरही आरोप केले होते. आरोपी अद्याप मोकाट आहेत असेही म्हटले होते. याच प्रकरणात अल्पवयीन मुलीची ओळख होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकाने बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याच घटनेत तपास कामात हयगय करणारे चार वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांनी काही दिवसापूर्वी निलंबित केले होते.

COMMENTS