समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

मुंबई : गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल

अमरावतीत महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या राज्यपालांची महत्वाची बैठक
तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं : अण्णा हजारेंचा इशारा
महाविद्यालयीन युवकाशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी हावलदाराविरुध्द गुन्हा दाखल

मुंबई : गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर वानखेडे याने फसवणूक करून सद्गुरू हॉटेल अँड बारचा परवाना घेतल्याचा आरोप आहे. यापूर्वी ठाणे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता.
ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, वानखेडे यांनी वयाची खोटी माहिती देऊन हॉटेल आणि बारचा परवाना घेतला होता. 1996-97 मध्ये ते 18 वर्षांखालील होते आणि परवान्यासाठी पात्र नव्हते. असे असतानाही त्यांनी ठाण्यातील सद्गुरू हॉटेलच्या करारात मेजर असल्याचा दावा केला होता. 1997 मध्ये समीर वानखेडे यांच्या सद्गुरू हॉटेलसाठी दाखल केलेल्या परवाना अर्जात वय चुकीचे दाखवण्यात आले होते. ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक आणि वानखेडे यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा सहा पानी आदेश देण्यात आला. या बारला मद्यविक्रीची परवानगी होती. जिल्हाधिकार्‍यांच्या चौकशीत वानखेडे यांनी 27 ऑक्टोबर 1997 रोजी हॉटेल आणि बारचा परवाना घेतल्याचे निष्पन्न झाले. परवाना मिळविण्यासाठी वयाची 21 वर्षे आवश्यक होती, परंतु वानखेडे यांचे वय तेव्हा 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला.

COMMENTS