Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’पन्नास खोके’ घोषणा देणार्‍याविरोधातील गुन्हा रद्द

मुंबई : ’पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणार्‍या वकिलाविरोधात नोंदवले

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मंत्रालयात अभिवादन
चितळसर पोलिसांची कारवाई, घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक 
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप | LokNews24

मुंबई : ’पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणार्‍या वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. दरम्यान सरकारने अपेक्षाभंग केल्यास उद्रेक तर होणारच, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.जळगावच्या धरणगाव येथील पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी अ‍ॅड. शरद माळी यांनी याचिका केली होती. न्या. विभा पंकणवाडी व न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवत अ‍ॅड. माळी यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला आहे.

COMMENTS