Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओशो आश्रम गोंधळप्रकरणी 125 जणांवर गुन्हा

पुणे ः कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रम येथे शिष्यांना गळ्यात माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी केल्याने बुधवारी मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर

ऐश्वर्याच्या ‘पोनियिन सेल्वन 2’ चित्रपटाचा धुमाकूळ
राजस्थानला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन
तपास यंत्रणा आणि राजकीय नाकेबंदी

पुणे ः कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रम येथे शिष्यांना गळ्यात माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी केल्याने बुधवारी मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर शिष्यांनी बळजबरीने आश्रमात प्रवेश केल्याने पोलिसांनी लाठीमार करत शिष्यांना बाहेर काढले. याप्रकरणी संबंधित आरोपींवर भारतीय दंड विधान संहिता कलम 143, 147, 452, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, ओशो आश्रम परिसरात झालेल्या गोंधळावेळी पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी वरुण विनीत रावल (27, रा. भिलाई, छत्तीसगड) या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस नाईक गोकुळ परदेशी (50) यांनी तक्रार दाखल दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशो आश्रमाचे व्यवस्थापन आणि अनुयायांच्या गटात वाद सुरू आहेत. याच वादातून ओशो ट्रस्टच्या विरोधातील अनुयायांनी 22 मार्च रोजी ओशो आश्रम येथे बेकायदेशीर जमाव जमवला. आश्रमाच्या गेटमधून जबरदस्तीने आत प्रवेश करुन ट्रस्टच्या विरोधात घोषणाबाजी करुन, तक्रारदार यांना शिवीगाळ करत आरोपी प्रमोद त्रिपाठी यांनी ट्रस्टच्या सदस्य साधना (80 वर्षे) यांना धक्काबुक्की केली. तसेच ओशो आश्रमाच्या विरोधात घोषणाबाजी करुन अनुयांयाना भडकावले होते.

COMMENTS