कोपरगाव प्रतिनिधी - तालुक्यात होऊ घातलेल्या २६ ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी ८५ तर सदस्यासाठी ५७१उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशिब आजमवण्य
कोपरगाव प्रतिनिधी – तालुक्यात होऊ घातलेल्या २६ ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी ८५ तर सदस्यासाठी ५७१उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशिब आजमवण्यास उतरले आहे.त्यासाठी येत्या १८डिसेंबरला मतदान होणार आहे.हि प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी कोपरगाव तालुका ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी उमेदवार आणि मतदारांना आवाहन केले.
तालुक्यातील पढेगांव येथील ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असुन सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी २८उमेदवार निवडणूक रिंगणात असुन २उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक जाधव यांनी शुक्रवारी सायंकाळी ६वाजता उमेदवार आणि ग्रामस्थांशी संवाद साधुन कुठलाही आपल्याकडून कुठलाहीअनुचित प्रकार घडणार नाही तसेच मतदारांना प्रलोभन दाखवणे,दबावतंत्र आणि सोशल मिडीयाचा गैरवापर न करता,मतदान पेटीची पुजा तथा मतदान केंद्राच्या आसपास गैरप्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही.तरी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.
गाव तशे शांतताप्रिय असुन निवडणूकीवरुन कधीच वादविवाद होत नाही. मतदान आटोपले की सर्वजण पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन चहा घेतात.पोलिस प्रशासनला कुठलीही तसदी होणार नाही अशे आश्वासन देऊन उत्तमराव चरमळ यांनी ग्रामस्थांच्या वतीनेआभार मानले.
संजय काळे सांगतात ते करा – सध्या संजय काळेंनी निवडणूक लागलेल्या गावांत नोटाचा प्रचार सुरु केला आहे.त्या अनुषंगाने गावाचा विकास करील असा उमेदवार बघा जर उमेदवार पसंत नसेल तर संजय काळे सांगतात तो नोटा वापरण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
COMMENTS