Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशाळगडावरील कार सेवा तात्पुरती स्थगित

कोल्हापूर प्रतिनिधी - महाशिवरात्रिपूर्वी किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे असा इशारा विशाळगड संवर्धन समिती आणि शिवप्रेमी, गडप्रेमीं ने दिल्

अडचणीत येण्याच्या भीतीने फडणवीस घाबरले : मलिक
भारतीय बनावटीच्या सफर मॉडेलला जागतिक स्तरावर मान्यता
हवामान बदलाचे वाढते धोके

कोल्हापूर प्रतिनिधी – महाशिवरात्रिपूर्वी किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे असा इशारा विशाळगड संवर्धन समिती आणि शिवप्रेमी, गडप्रेमीं ने दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाशिवरात्रिपूर्वी अतिक्रमण काढावी अशी भूमिका प्रशासनाने घ्यावी अन्यथा महाशिवरात्री दिवशी कार सेवा करू असा इशारा दिला होता. मात्र त्यासंबंधी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवप्रेमी आणि प्रशासनाची बैठकी झाली. या बैठकीत लवकरच आम्ही अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेणार असून कारसेवा मोहीम स्थगित करावी असा अहवाल जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं. 18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही कार सेवा स्थगित करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं. त्याला प्रतिसाद देत शिवप्रेमींकडून कार सेवा तात्पुरती स्थगित केली आहे

COMMENTS