Homeताज्या बातम्यादेश

दहशतवाद्यांशी लढतांना कॅप्टनला वीरमरण

चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश

श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांविरूद्ध शोधमोहीम सुरू होती. अखेर बुधवारी भारतीय लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा

राज्यात गारठा वाढला पावसाची शक्यता
गणपतींच्या आशीवार्दाने गरजूंची सेवा घडते : महेश निमोणकर
नऊ दिवस महिलांसाठी मोफत तपासणी शिबिराचे अश्विनी बोरस्ते यांच्या हस्ते उद्घाटन

श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांविरूद्ध शोधमोहीम सुरू होती. अखेर बुधवारी भारतीय लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले, मात्र या चकमकीत कॅप्टन दीपक यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. शहीद कॅप्टन दीपक हे 48 राष्ट्रीय रायफल्सचे असल्याचे लष्कराने सांगितले. डोडा येथील असार वनक्षेत्रात सुरू असलेल्या चकमकीत ते टीमचे नेतृत्व करत होते. बुधवारी सकाळी गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
असार क्षेत्रातील एका नदीकिनारी लपलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. बुधवारी सकाळी एन्काऊंटर करण्यात येत असलेल्या जागेवर आपली शस्त्र टाकून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. घटनास्थळावरुन अमेरिका एम 4 रायफलही जप्त करण्यात आली असून तीन बॅगेतून स्फोटकेही जप्त करण्यात आली होती. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली दहशवाद्यांच्या घटनांवरुन बैठका सुरू असून गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  गुप्तचर माहितीचा हवाला देऊन सूत्रांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेवर असलेल्या एका गावात अलीकडेच शस्त्रांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या आहेत. ते जवळच्या पठाणकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  असार वन परिसरात अजूनही चकमक सुरू आहे. दहशतवादी जंगलात एका नदीजवळ लपून गोळीबार करत आहेत. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटनांवर संरक्षणमंत्र्यांनी दिल्लीच्या साउथ ब्लॉकमध्ये तातडीची बैठक बोलावली. एनएसए अजित डोभाल, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख यात सहभागी झाले होते. बैठकीची माहिती समोर आलेली नाही. स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जम्मू भागात 3000 हून अधिक लष्कराचे जवान आणि 2000 बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दहशतवादाचा सामना करण्यासाठी आसाम रायफल्सचे सुमारे 1500-2000 सैनिकही तैनात केले जात आहेत.

COMMENTS