कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी नगरमध्ये कँडल रॅली..

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी नगरमध्ये कँडल रॅली..

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये कोरोनाचे संकट दूर होऊन नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी कँडल रॅली काढून देवाकडे प्रार्थना करण्यात आली.

संगमनेरमध्ये बस व मोटर सायकलचा अपघात
गोदावरी कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यात येतील  – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पाथर्डी नगरपरिषदेवर धडकला हंडा मोर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये कोरोनाचे संकट दूर होऊन नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी कँडल रॅली काढून देवाकडे प्रार्थना करण्यात आली. अंधारातून प्रकाशाची नवी साक्ष घेऊन समाज घडवण्याचे काम यातून व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. अहमदनगर पहिली मंडळी चर्चच्यावतीने ही कँडल रॅली काढण्यात आली होती.
नाताळ सणानिमित्त अहमदनगर पहिली मंडळी चर्चच्यावतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला मेणबत्ती मिरवणूक (कँडल रॅली) काढण्यात आली. यावेळी आचार्य रेव्हरंड जनार्दन वाघमारे, ले-लीडर सुनील नन्नवरे, अहमदनगर पहिली मंडळीचे सचिव अमोल लोंढे, खजिनदार सॅम्युवेल खरात, कार्यक्रम समिती अध्यक्ष राहुल थोरात, सुनीत ढगे, अजित ठोकळ, शिरीष लाड, ईदरनिल देठे, गिरीश शिरसाठ, श्रीकांत गायकवाड, प्रसन्ना शिंदे, शिल्पा खरात, अर्चना लोखंडे, कुसुम थोरात,तरूण संघ अध्यक्ष हर्षल जाधव यांच्यासह महिला मंडळ, ज्येष्ठ संघ, तरूण संघ, संडे स्कूल व मान्यवर मंडळीतील सर्व सभासद उपस्थित होते.
अहमदनगर पहिली मंडळी चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रभू येशू ख्रिस्तांचे विचार प्रत्येकाने अंगीकारून समाज घडवावा तसेच नगर शहरामध्ये कोरोनाचे संकट दूर होऊन नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली व कँडल रॅली काढून अंधारातून प्रकाशाची नवी साक्ष घेऊन समाज घडवण्याचे काम केले जात आहे, असे प्रतिपादन अहमदनगर पहिली मंडळीचे आचार्य रेव्हरंड वाघमारे यांनी यावेळी केले. प्रभू येशू ख्रिस्ताने जो नवा प्रकाश आम्हाला मंदिरामधून दिला आहे, तो आम्ही घेऊन समाजामध्ये नव प्रकाशाची साक्ष देऊन समाज घडवण्याचे काम करीत आहोत, असे ते म्हणाले.

COMMENTS