Homeताज्या बातम्याशहरं

शाम्पूपासून कॅन्सरचा धोका; जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी अडचणीत

नवी दिल्ली : हिंदुस्थान युनीलिव्हरची मूळ जगप्रसिध्द कंपनी युनिलिव्हर अडचणीत आली आहे. या कंपनीच्या शाम्पूच्या उत्पादनांपासून कॅन्सरचा धोका असल्याचे सम

तांबवेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सलग तिसर्‍या वर्षी विक्रमी रक्तदान
कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा भांडाफोड लवकरच होणार
यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती

नवी दिल्ली : हिंदुस्थान युनीलिव्हरची मूळ जगप्रसिध्द कंपनी युनिलिव्हर अडचणीत आली आहे. या कंपनीच्या शाम्पूच्या उत्पादनांपासून कॅन्सरचा धोका असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या शॅम्पू ब्रँडमध्ये कॅन्सरचा धोका असलेले रसायन सापडले आहे. कंपनीने यूएस बाजारातून परत मागवले आहेत.
जॉन्सन अँड जॉन्सननंतर अशा प्रकारचा फटका बसलेली ही दुसरी अमेरिकी कंपनी आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार या शाम्पूमध्ये बेंझीन हे कॅन्सरची उत्पत्ती करणारे रसायन सापडले आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) नुसार ही उत्पादने ऑक्टोंबर 2021 च्या पूर्वी बनविण्यात आली होती. ही उत्पादने अमेरिकेतील प्रत्येक दुकानात वितरित करण्यात आली होती.
यामध्ये Dove Dry Shampoo Volume and Fullness, Dove Dry Shampoo Fresh Coconut, Nexxus Dry Shampoo Refreshing Mist, Suave Professionals Dry Shampoo Refresh and Revive या शाम्पूंचा समावेश आहे.

COMMENTS