Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य जनजागृतीद्वारे कॅन्सरवर नियंत्रण शक्य- डॉ.अक्षय कांबळे

तुलसी व माता रमाई नर्सिंग कॉलेजमध्ये आरोग्य जनजागृतीसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजनबीड । प्रतिनिधीबदलती जीवनशैली, अयोग्य आहार पद्धती, वाढती व्यसनाधी

शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी
Beed : माजलगाव नगराध्यक्ष यांची बदनामी करणाऱ्या वर कारवाई करा ! (Video)
विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर आमंत्रित

तुलसी व माता रमाई नर्सिंग कॉलेजमध्ये आरोग्य जनजागृतीसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन
बीड । प्रतिनिधी
बदलती जीवनशैली, अयोग्य आहार पद्धती, वाढती व्यसनाधीनता आणि शारीरिक कष्टाचा अभाव यामुळे समाजात कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या जीवघेण्या आजारापासून दूर राहायचे असेल तर नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.अक्षय कांबळे यांनी केले.
जागतिक कॅन्सर दिनानिमित्त बीड येथील तुलसी व माता रमाई नर्सिंग कॉलेजमध्ये आयोजित विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.डी.राऊत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गुरुकुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार बांदल उपस्थित होते. डॉ.अक्षय कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत जागरूकतेचा महत्त्वपूर्ण संदेश देत बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणार्‍या कॅन्सरच्या धोक्याबाबत सावध केले. नियमित व्यायाम, संतुलित आहार, व्यसनमुक्त जीवनशैली आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी ही कॅन्सर प्रतिबंधासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.विजयकुमार बांदल यांनी आरोग्य शिक्षणात नर्सिंग विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. समाजामध्ये जनजागृती करून निरोगी समाज घडविण्यात या विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डी.डी.राऊत यांनी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले ज्ञान समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख प्रा.अब्रार पठाण यांनी केले, तर आभार प्रा.इनामदार सोहेल यांनी मानले. कार्यक्रमाला  महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS