Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुसडगाव जलजीव योजनेचा चुकीचा सर्वे रद्द करा

बापुसाहेब कारले यांच्यासह ग्रामस्थांची मागणी

जामखेड प्रतिनिधी ः तालुक्यातील कुसडगाव येथील जलजीवन योजनेचा चुकीचा सर्वे रद्द करून कार्यारंभ आदेश रद्द करावा संपूर्ण गावाला या योजनेचा फायदा असा

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून योग्य दिशेने मार्गक्रमण करावे – भटनागर
शेतकर्‍यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा : आ.आशुतोष काळे
‘त्या’ तरुणीने विषारी औषध घेवून केला आत्महत्येचा प्रयत्न

जामखेड प्रतिनिधी ः तालुक्यातील कुसडगाव येथील जलजीवन योजनेचा चुकीचा सर्वे रद्द करून कार्यारंभ आदेश रद्द करावा संपूर्ण गावाला या योजनेचा फायदा असा सर्वे पुन्हा करावा अन्यथा पंचायत समितीवर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा सरपंच व सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर याना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे जलजीवन मिशन अंतर्गत कुसडगाव येथील वाड्या वस्त्यांचा समावेश करण्यात याव्या. मौजे कुसडगांव येथील भोगलवाडीसाठी काझेवाडी तलावावर विहीर करून  कायस्वरूपी पाण्याची सुविधा होईल. भोगलवस्ती व लेकुरवाळे वस्ती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याठिकाणी 20 ते 25 हजार लिटरची स्वतंत्र टाकीची आवश्यकता आहे. कुसडगांवसाठी काझेवाडी तलावामधून स्वतंत्र विहीर व 80 हजार लिटरच्या टाकीची आवश्यकता आहे. याविषयी संबंधित प्रशासनाला वारंवार अर्ज केलेले आहेत.सध्याचा दिलेला आदेश हा आमच्या मागणी प्रमाणे नसून तो आम्हाला मुळीच मान्य नाही. तरी चुकीच्या पध्दतीने केलेला सर्वे तात्काळ दुरुस्त करून फेर निविदा करुन गावाचे होणारे नुकसान टाळावे. अन्यथा पंचायत समिती, कार्यालयावरसमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर माजी सरपंच बापूसाहेब कार्ले, सरपंच शहाजी गाडे,उपसरपंच रुपसुंदरा वटाणे, माजी सरपंच दत्तात्रय कार्ले, ग्रा.पं. सदस्य वंदना कात्रजकर, अंकुश कात्रजकर, मंजुषा भोगले, मधुकर खरात आदींच्या साह्य आहेत.

COMMENTS