मुंबई ः एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर केलेल्या जय पॅलेस्टाईन घोषणेमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आ
मुंबई ः एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर केलेल्या जय पॅलेस्टाईन घोषणेमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण खासदार ओवैसींच्या या शपथविधीच्या व्हिडिओवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्याची माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ही मागणी केली आहे. तसेच, ओवैसींकडून भारतीय संविधानाचे उल्लंघन झाल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं यांना पत्र लिहून असदुद्दीन ओवैसींनी जय पॅलेस्टाईन म्हणत केलेल्या घोषणेस राणा यांनी आक्षेप घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 102-103 नुसार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.ओवैसी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेताना, जय पॅलेस्टाईनचा नार देत आपली शपथ पूर्ण केली होती. त्यामुळे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी पत्रातून केला आहे.
COMMENTS